31/10/2021
We received such a nice review from one of our guests on airbnb !!! It's in Marathi :)
P.s : copy and pasted from what's app !! 👇
आम्ही ७.३० ला पोचलो घरी. जरा दमलो होतो. म्हणून फ्रेश झाल्यावर जेवण करून तुम्हाला मेसेज करावं म्हणून आत्ता मेसेज करत आहे...
मनःपूर्वक धन्यवाद. आम्हाला तुमचं घर खूप आवडलं. प्रवास करून जेव्हा तिकडे घरी आलो तेव्हा घर बघूनच आमचा थकवा निघून गेला. एअर bnb वर जसे फोटो होते अगदी तसच घर आम्ही बघितलं अगदी स्वच्छ आणि नीटनेटके....
आणि जेव्हा आम्ही तुमच्या कडून जेवण मागवले.... तेव्हा उरलेला सगळा आमचा थकवा निघून गेला. जेवण खरंच खूप छान होतं. अगदी घरी जेवल्यासारखे वाटले...
तुम्हा सर्वांशी बोलून आणि भेटून सुद्धा खूप छान वाटलं. कधीही पुण्यात आला... तर आवर्जून सगळे आमच्याकडे या....
आशा करतो की जसं तुमचं घर तुम्ही आम्हाला राहायला दिलं होतं, आम्ही सुद्धा ते तसच काळजीपूर्वक ठेवलं आणि घरातल्या गोष्टी नीट हाताळल्या. आमच्या कडून जर काही चुकलं असेल तर क्षमस्व...
एअर bnb वर मी आत्ताच थोड्या वेळा पूर्वी रिव्ह्यू दिला आहे.
परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 🙏🙂