AESA Ahmednagar

Call Directions Website Contact the business

AESA Ahmednagar ARCHITECTS ENGINEERS AND SURVEYORS ASSOCIATION

अवॉर्ड फंक्शन साठी तयारी या विषयावर कार्यशाळा शहरातील बांधकाम क्षेत्रातील कामांचा दर्जा सुधारण्यास उपयुक्त. -- आर्की . म...
10/11/2026

अवॉर्ड फंक्शन साठी तयारी या विषयावर कार्यशाळा शहरातील बांधकाम क्षेत्रातील कामांचा दर्जा सुधारण्यास उपयुक्त. -- आर्की . महेश बांगड.
आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हअर्स असो अहिल्यानगर यांच्या वतीने पुण्यातील एसा या संलग्न संस्थेच्या तज्ञ व्यक्तींचे बांधकाम क्षेत्रातील मानांकित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक तयारी बाबत मार्गदर्शनकपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पुणे ऐसा अध्यक्ष शेखर गरूड, आर्की. हेमंत महाजन , इंजि. मनोज देशमुख, इंजि. आरती भट आणि आर्कि. महेश बांगड यांचे पॅनल पाचारण करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना संस्था अध्यक्ष प्रदिप तांदळे यांनी सांगितले की अहिल्यानगरमध्ये दर्जेदार कामे होतात परंतु त्यांचे रेकॉर्ड व्यवस्थित जतन केले जात नाही आणि आपण सादरीकरण करण्यात कमी पडतो. अश्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून त्याचा फक्त अवॉर्ड फंक्शन पुरता विचार न करता त्याचा उपयोग कामाचा दर्जा सुधारण्यासाठी झाला पाहिजे. प्रास्ताविकात पुणे ऐसा अध्यक्ष आर्की. शेखर गरूड यांनी पुणे ऐसा राबवत असलेले विविध उपक्रम आणि त्यांची संघटना कधी बळकट झाली याची माहिती सभासदांना दिली. अवॉर्ड फंक्शन ची आवश्यकता नमूद करताना त्यांनी पुण्यातील मानाच्या स्पर्धेत आमचे सभासद सहभागी होऊन विजेते ठरत असल्याचे सांगितले. यामुळे आपला काम करण्याचा उत्साह वाढतो तसेच असून नेमके कोणत्या पातळीवर आहोत याचा अंदाज येत असल्याचे सांगितले. पुण्यातील प्रथित यश आर्किटेक्ट हेमंत महाजन यांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन विविध पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी ड्रॉइंग कसे असावेत, काम चालू असताना रेकॉर्ड कसे सांभाळावे, आपला सहभाग कसा असावा त्यासाठी तयारी कशी करावी अश्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्याच बरोबर त्यांनी २००६ पासून केलेल्या आणिविजेते ठरलेल्या विविध कामांचे प्लॅन, फोटो प्रेझेंटेशन प्लॅनसह व्हिडिओ शूटिंग दाखवले. त्यानंतर इंजि. मनोज देशमुख यांनी कागदपत्रांची पूर्तता, साईट व्हिजीट साठी तयारी कशी करावी या विषयी मार्गदर्शन केले. यासाठी वेळोवेळी केलेल्या कामाचे रेकॉर्ड, फोटो आणि शूटिंग संभाळून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्युरीज साईट व्हिजीट वेळी आपले केलेल्या कामाचे रेकॉर्ड, टेस्ट रिपोर्ट बरोबर ठेवावे. पुण्यातील विविध संस्थांवर पदाधिकारी पदावर काम पाहणाऱ्याव आर सी सी डिझाइनर आरती भट यांनी आर सी सी डिझाइन मधील बारकावे समजावून सांगताना आपले कामातील वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या गोष्टी ज्युरी पॅनल यांना लक्षात आणून देणे बाबत माहिती दिली. तसेच कामासाठी गुड फॉर वर्क प्लॅन वापरावेत यासाठी तेच प्लॅन व्हिजिट वेळी असावेत तसेच आर एम सी आणि इतर गोष्टींचे टेस्ट रिझल्ट रेकॉर्ड साठी ठेवावेत. आर सी सी डिझाइनर यांचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र तसेच स्लॅब चेकिंग प्रमाणपत्र बरोबर असावीत. आर्की. महेश बांगड यांनी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा चांगली कामे शहरात होण्यासाठी अशा स्पर्धांचा उपयोग आणि एसा संस्थेचा शहर विकास आणि सुदृढ स्ट्रक्चर उभारण्यात भूमिका याबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमासाठी पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे, आदेश गुंगे आणि एसाचे दत्तात्रय शेळके, कोमल कुलकर्णी, नंदकिशोर घोडके, प्रल्हाद जोशी, वैभव देशमुख तसेच संचालक भुषण पांडव, अनमोल जैन, संतोष खांडेकर, सुनिल जाधव, सचिन डागा, संकेत पादिर, गौरव मांडगे, अमोल येनगंदुल, आदिनाथ आंबेकर, सागर ढगे, विजय उजनीमठ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्वर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सुनील औटी यांनी उपस्थितांचे आभार मानले...

*पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी सावधान* या विषयावर संस्था माजी अध्यक्ष इंजि. प्रकाश जैन यांचा लेख प्रकाशित झाला. सध्य...
10/11/2026

*पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी सावधान* या विषयावर संस्था माजी अध्यक्ष इंजि. प्रकाश जैन यांचा लेख प्रकाशित झाला. सध्या शहरांमध्ये पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात वाढली असून ती करताना विविध बाबींचा अभ्यास आणि माहिती असणे आवश्यक आहे. वरील लेखामध्ये इंजि. प्रकाश जैन यांनी अतिशय सविस्तर माहिती दिली असून आपल्या संग्रही ठेवावा असा हा लेख आपण अवश्य वाचावा तसेच आपल्या क्षेत्राशी संबंधित इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर संस्थेच्या नावासह पोस्ट करावा ही नम्र विनंती. हा लेख दिल्याबद्दल इंजि. प्रकाश जैन आणि प्रकाशित केल्याबद्दल नवा मराठा वृत्त पत्राचे संपादक ललित गुंदेचा सरांचे मनपुर्वक आभार आणि धन्यवाद..@

तसेच सविस्तर लेख वाचण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.
Page 8 - 07 November 2026 https://epaper.enavamaratha.com/news/96660/6aef171e411d9

02/11/2026
*AESA AHILYANAGAR in association with Pollad Steel Jalna* Invites all AESA members for following session.✨ *कोणत्याही Aw...
02/11/2026

*AESA AHILYANAGAR in association with Pollad Steel Jalna* Invites all AESA members for following session.

✨ *कोणत्याही Award Competition मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक तयारी व मार्गदर्शन कार्यशाळा* ✨

बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड स्पर्धेची तयारी कश्या प्रकारे करावी, यातील विविध बारकावे तसेच विविध पैलूंवर याचा गाढा अभ्यास आणि अनुभव असणारे पुण्यातील प्रतिथयश पॅनल प्रकाश टाकणार आहेत. मागील वर्षी जवळपास १०० एंट्रीज एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड साठी आल्या होत्या या निमित्ताने आपणास आणखी चांगल्या पद्धतीने यावर काम करता येणार आहे.
या संधीचा सर्वांनी उपस्थित राहून फायदा घ्यावा हि नम्र विनंती.. 🙏

बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड स्पर्धेत आपल्याला अवॉर्ड मिळणे हे खरे तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते. आपण या स्पर्धेत खूपच स्पर्धा असल्याने कधीच जिंकू शकत नाही असे वाटत असताना योग्य प्रकारे कामाचे नियोजन आणि संबंधित क्षेत्रात काम करून रेकॉर्ड मेन्टेन केल्यावर साध्य होऊ शकते. याचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी घेतला आहे, त्यानंतर मिळणारे समाधान आणि आनंद याचे मोजमाप कुठल्याही धनराशीत करता येणार नाही. तसेच अश्या स्पर्धेतील सहभाग आपला आत्मविश्वास दुणावण्यास फायदेशीर राहतो. *या उपक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करण्याचा पूर्ण देशातील विविध स्पर्धेचा अनुभव असणारे गेस्ट आपल्याला लाभले आहेत.* या सुवर्णसंधीचा लाभ आपण या कार्यक्रमास नावनोंदणी करून आणि सहभागी होऊन सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती.. 🙏

कोणत्याही पुरस्कार स्पर्धेत सहभागी होताना नेमकी तयारी कशी करावी? मार्किंग सिस्टीम व गुणांकनाचे निकष काय असतात? डॉक्युमेंटेशन, प्रभावी सादरीकरण आणि साइट व्हिजिटसाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी? या सर्व महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

📅 दिनांक : सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ : सकाळी १०:३० ते दुपारी १:००
📍 स्थळ : Hotel Sage & Salt, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर

🌟 पुरस्कार स्पर्धेत यशस्वी सहभागासाठी योग्य नियोजन, अचूक तयारी आणि प्रभावी सादरीकरणाची दिशा देणारी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

या कार्यशाळेसाठी अश्या प्रकारच्या अवॉर्ड फंक्शन साठी पूर्ण देशातील मोठ्या संस्थांवर ज्युरीजचे काम केलेले अनुभवी सदस्य या निमित्ताने आपल्यात येत आहेत. मागील AESA बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड साठी ज्युरीजचे काम पाहिलेले सदस्य यामध्ये आहेत.*_🌟

पुण्यातील बांधकाम क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या दिग्गज व्यक्तींची टीम या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये येत आहे. या निमित्ताने पुणे AESA बरोबर ऋणानुबंध आणखी दृढ होऊन भविष्यात आणखी दर्जेदार कार्यक्रम आयोजनास हातभार लागणार आहे.

✨*कार्यक्रमाची वेळेत सुरुवात करणार असून कार्यक्रमानंतर लंचचे आयोजन केले आहे*.✨

📢 सर्व सदस्यांनी या मार्गदर्शक कार्यशाळेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती...🙏

*आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (AESA), अहिल्यानगर*

*AESA AHILYANAGAR in association with Pollad Steel Jalna*✨ *कोणत्याही Award Competition मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक त...
02/11/2026

*AESA AHILYANAGAR in association with Pollad Steel Jalna*

✨ *कोणत्याही Award Competition मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक तयारी व मार्गदर्शन कार्यशाळा* ✨

बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड स्पर्धेची तयारी कश्या प्रकारे करावी, यातील विविध बारकावे तसेच विविध पैलूंवर याचा गाढा अभ्यास आणि अनुभव असणारे पुण्यातील प्रतिथयश पॅनल प्रकाश टाकणार आहेत. मागील वर्षी जवळपास १०० एंट्रीज एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड साठी आल्या होत्या या निमित्ताने आपणास आणखी चांगल्या पद्धतीने यावर काम करता येणार आहे.
या संधीचा सर्वांनी उपस्थित राहून फायदा घ्यावा हि नम्र विनंती.. 🙏

बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड स्पर्धेत आपल्याला अवॉर्ड मिळणे हे खरे तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते. आपण या स्पर्धेत खूपच स्पर्धा असल्याने कधीच जिंकू शकत नाही असे वाटत असताना योग्य प्रकारे कामाचे नियोजन आणि संबंधित क्षेत्रात काम करून रेकॉर्ड मेन्टेन केल्यावर साध्य होऊ शकते. याचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी घेतला आहे, त्यानंतर मिळणारे समाधान आणि आनंद याचे मोजमाप कुठल्याही धनराशीत करता येणार नाही. तसेच अश्या स्पर्धेतील सहभाग आपला आत्मविश्वास दुणावण्यास फायदेशीर राहतो. *या उपक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करण्याचा पूर्ण देशातील विविध स्पर्धेचा अनुभव असणारे गेस्ट आपल्याला लाभले आहेत.* या सुवर्णसंधीचा लाभ आपण या कार्यक्रमास नावनोंदणी करून आणि सहभागी होऊन सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती.. 🙏

कोणत्याही पुरस्कार स्पर्धेत सहभागी होताना नेमकी तयारी कशी करावी? मार्किंग सिस्टीम व गुणांकनाचे निकष काय असतात? डॉक्युमेंटेशन, प्रभावी सादरीकरण आणि साइट व्हिजिटसाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी? या सर्व महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

📅 दिनांक : सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ : सकाळी १०:३० ते दुपारी १:००
📍 स्थळ : Hotel Sage & Salt, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर

🌟 पुरस्कार स्पर्धेत यशस्वी सहभागासाठी योग्य नियोजन, अचूक तयारी आणि प्रभावी सादरीकरणाची दिशा देणारी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

या कार्यशाळेसाठी अश्या प्रकारच्या अवॉर्ड फंक्शन साठी पूर्ण देशातील मोठ्या संस्थांवर ज्युरीजचे काम केलेले अनुभवी सदस्य या निमित्ताने आपल्यात येत आहेत. मागील AESA बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड साठी ज्युरीजचे काम पाहिलेले सदस्य यामध्ये आहेत.*_🌟

पुण्यातील बांधकाम क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या दिग्गज व्यक्तींची टीम या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये येत आहे. या निमित्ताने पुणे AESA बरोबर ऋणानुबंध आणखी दृढ होऊन भविष्यात आणखी दर्जेदार कार्यक्रम आयोजनास हातभार लागणार आहे.

✨*कार्यक्रमाची वेळेत सुरुवात करणार असून कार्यक्रमानंतर लंचचे आयोजन केले आहे*.✨

📢 सर्व सदस्यांनी या मार्गदर्शक कार्यशाळेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती...🙏

*आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (AESA), अहिल्यानगर*

उद्या AESA ग्रुप सिरिज अंतर्गत आयोजित गरबा दांडिया नाईट २०२६ आर जे प्रसन्न सह.. More Entertainment More Fun... All regis...
23/10/2026

उद्या AESA ग्रुप सिरिज अंतर्गत आयोजित गरबा दांडिया नाईट २०२६ आर जे प्रसन्न सह.. More Entertainment More Fun... All registered members for event plz join us...

*NEWS TODAY 24**अहिल्यानगर : एसा सभासदांची चिचोंडी शिराळ येथील आनंद तीर्थला भेट.*एसा सभासदांची चिचोंडी शिराळ येथील आनंद ...
23/10/2026

*NEWS TODAY 24*

*अहिल्यानगर : एसा सभासदांची चिचोंडी शिराळ येथील आनंद तीर्थला भेट.*

एसा सभासदांची चिचोंडी शिराळ येथील आनंद तीर्थला भेट.

स्थापत्य कलेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार साकारण्याचे कार्य गुरु आनंद फाउंडेशने केले

आनंद तीर्थाचे काम लवकरच पूर्ण होणार - अशोक पितळे.

अहिल्या नगर पासून अवघ्या तीस किमी अंतरावर राष्ट्र संत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्मगावी विविध मंदिर, प्रशासकीय इमारत, भक्तनिवास, भोजनालय अश्या विविध इमारतींची कामे चिचोंडी शिराळ येथे मागील दहा वर्षापासून चालू आहेत. आपल्या शहरापासून जवळच सुबक, आकर्षक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चालू असलेल्या कामांना संस्थेच्या वतीने भेट देण्याचे नियोजन ट्रस्टची परवानगी घेऊन करण्यात आले. संस्थेच्या जवळपास ७० आर्किटेक्ट इंजिनीअर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या परिसरात शमोशरण तीर्थ, नावकार कलश तीर्थ, गुरु चरण तीर्थ अश्या जैन समाजाच्या दृष्टीने पवित्र मंदिरांचे स्थापत्य कलेच्या दृष्टीने आताच्या काळातील सर्वोत्कृष्ट बांधकामे उभारण्याचे काम चालू आहे. संस्थेच्या सभासदांनी पाँडिचेरी येथील २०१० साली मातृ मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात आलेले लोटस टेम्पलला स्टडीटूर द्वारे भेट दिली होती. याच धर्तीवर साकारण्यात येत असणारे गुरू चरण तीर्थ हे या अभ्यास दौऱ्याचे मुख्य आकर्षण होते. भारतातील सुप्रसिध्द आर्की. देवेंद्र सोमपूरा यांनी गुरू चरण तीर्थ या मुख्य मंदिराचे प्लॅनिंग केले आहे. जवळपास ३०,००० चौ फूट क्षेत्राचा बिल्ट अप, मधील केंद्रस्थानी ८० फूट उंच. स्टील ऐवजी एफ आर पी बार चा वापर आणि ८० एम पी ए ताकदीचे काँक्रिट, ग्रीड स्लॅब , प्रचंड पाकळ्यासाठी वापरलेले फेरो सिमेंट सारखे तंत्रज्ञान, तसेच नैसर्गिक ए सी कुलर सिस्टीमसाठी कौलारू प्लेट मधून पाणी आणि हवा वाहून जाण्यासाठी केलेली योजना. अश्या विविध छटा या इमारतीमध्ये दिसून आल्या. एंट्री जवळील एसा संस्थेचे आर्की. प्रितेश गुगळे यांनी प्लॅनिंग केलेले आणि इंजि. शाम गुलाटी इंजि. धनेश मुनोत यांनी साकारलेली प्रशासकीय इमारत तसेच तेथील ऑडियोटोरियम हॉल लक्ष वेधून जातो. त्यानंतर भक्त निवास आणि भोजन कक्ष ज्याचे काम आर्की. प्रमोद बेरी सरांच्या कामाची छाप दर्शवितो. अहिल्या नगर पासून ३० की मी अंतरावर इतक्या चिचोंडी सारख्या खेडेगावात इतक्या मोठ्या प्रमाणात वास्तू विशारद, अभियांत्रिकीचा, लँडस्केप यांचा आविष्कार असणारे काम पाहण्यास मिळणे ही संस्थेच्या उपस्थित सभासदांसाठी मोठ्या समाधानाची बाब होती. आनंद तीर्थ प्रकल्प भेट अतिशय ज्ञानवर्धक सर्वांना प्रेरणादायी तसेच भक्तिमय वातावरणात पार पडली. गुरुआनंद फाउंडेशन ट्रस्ट मार्फत शहरापासून जवळ अतिशय उच्च दर्जाचे काम पाहण्यास मिळणे हा सर्व एसा सभासदांसाठी आश्चर्याचा सुखद धक्काच होता. प्रवेश द्वाराजवळील इमारतीपासून, भक्त निवास, गुरू चरण मंदिर, ध्यान केंद्र मंदिर, कलश मंदिर अशी विविध स्ट्रक्चर आणि त्यांची कामे आमच्या आर्किटेक्ट इंजिनीअर्स यांच्या दृष्टीतून पाहण्यासारखी आहेत. सर्वांना तेथील वातावरण, लँडस्केप, आर्कीटेक्चरल सौंदर्य आणि सिव्हिल इंजिनीअरिंग मधील कामांची गुणवत्ता प्रभावित करणारी आहेत. त्याच बरोबर रस्त्यांची कामे, लेव्हल, रंगसंगती, शिस्त , भोजन व्यवस्था उच्च दर्जाची आहेत. आनंद तीर्थ येथील सर्व अधिकारी आणि स्टाफने अतिशय चांगली वागणूक एसा सभासदांना दिली. गुरुआनंद फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष सी ए सतीश सुराणा, ट्रस्टी अशोक पितळे , ट्रस्टी सुनील नहार यांचे हे सर्व स्ट्रक्चर्स उभारणीत मागील दहा वर्षांपासून भरीव योगदान आहे. आनंद तीर्थ वरील व्हिजिट निमित्ताने आम्हाला सिव्हील इंजिनियरिंग क्षेत्रातील एक चांगले स्थापत्य शिल्प पाहण्याची आणि तांत्रिक स्टाफ कडून त्याची तांत्रिक माहिती करून दिल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आनंद तीर्थ येथील व्यवस्थापक संजय गुगळे, तेथील तांत्रिक काम पाहणारे प्रविण वाकचौरे आणि सुमित कुमावत यांनी कामास वापरलेले साहित्य, वेगवेगळ्या इमारतींचे प्लॅनिंग केलेले आर्किटेक्ट, कामासाठचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी उपयुक्त माहिती एसाच्या आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्स यांना दिली. या सर्व आयोजनात संस्था सभासद आर्की. कविता जैन, आर्कि. प्रितेश गुगळे आणि दादासाहेब बेरड यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच अहिल्या नगर मधील नामवंत सी ए आणि गुरू आनंद फाउंडेशनचे ट्रस्टी अशोक पितळे यांनी भरीव सहकार्य केले. या उपक्रमास संस्था अध्यक्ष प्रदिप तांदळे, सचिव भूषण पांडव, उपाध्यक्ष सुनिल औटी, संतोष खांडेकर, सुनिल जाधव, गौरव मांडगे, सचिन डागा, सागर ढगे, अमोल येनगंदूल आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://youtu.be/8Pzm0mS7O4o

-------------------------------------------------------

22/10/2026

परवा सकाळी करंजी घाटाजवळील पाथर्डी तालुक्यातील मांडवा गावात संदीप राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले आनंद वन येथे आपटा महोत्सव आणि वृक्ष पूजन कार्यक्रमास कल्याणी गौरव फिरोदिया (संचालिका ऊर्जा गुरुकुल शाळा) यांच्यासह एसा अध्यक्ष या नात्याने प्रमुख उपस्थितीचा मान मिळाला. एसा सभासद आणि आमचे मित्र जयप्रकाश विधाते यांच्या मार्फत आनंद विद्यालय चिचोंडी मधील शिक्षक साबळे सर यांनी वरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. आपटा महोत्सव म्हणजे नेमके काय या विषयी उत्सुकता होतीच. आज दसऱ्याच्या शुभमुहूर्ती सकाळी मांडवा गावी जाताना ऐन ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची जाणीव उन्हामुळे रस्त्याने झाली. परंतु आनंद वन कमानीतून आत प्रवेश केल्यावर आतील विविध देशी वृक्ष आणि फलक पाहून इथे काहीतरी वेगळी कामे होत असल्याची जाणीव झाली. शंभर एकर पेक्षा जास्त पडीक असलेल्या या वन विभागाच्या ताब्यातील जागेचे मागील आठ वर्षात संदिप राठोड सर आणि त्यांचे सहकारी यांनी सोने केले आहे. त्यांनी यातील आतापर्यंत ३१ एकर जागा वृक्षारोपण करून विकसित केली असून येथे वेगवेगळी देशी वृक्ष, औषधी झाडे लावली आहेत. सिद्धार्थ वडाला नवजीवन देऊन त्याच्या फांद्यांच्या स्वरूपात जवळपास ५६ वड त्यातून साकारले आहेत. कल्याणीजी फिरोदिया, या क्षेत्रात काम करणारे अमित सर तसेच मित्र शंतनु खानविलकर यांच्या सहवासात आपट्याच्या वृक्षाचे पूजन केले. त्याची शास्त्रीय माहिती त्यांनी दिली. मागील काही दिवस आधी महाराष्टातील दिग्गज अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचे दुःखद निधन झाले. आनंदवन विकसित करण्यात नाम फाऊंडेशन यांनी या वर्षापर्यंत भरीव सहकार्य केले होते. संदिप राठोड सर नानांच्या अंत्यदर्शनाला गेले असता येताना त्यांच्या काही अस्ति घेऊन आले होते. त्या अस्थी आज आपट्याचे वृक्षारोपण करताना त्याबरोबर विसर्जित करण्यात आल्या. संदिप राठोड सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अपार कष्ट करून येथे जवळपास ३१००० रोपांतून त्यांचे संवर्धन करून नंदनवन खुलवले आहे. या वर्षी ऑक्टोबर मध्येच झाडांसाठी आणि तिथे विकसित झालेल्या जीवसृष्टी साठी पाण्याची वणवा झाली असली तरी न डगमगता या वर्षी जास्त वृक्षारोपण न करता आतापर्यंत लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यास ते सिद्ध झाले आहेत. तेथे प्राणीमात्रांसाठी नैसर्गिक भासतील असे पाणवठे त्यांनी बनवले आहेत, पाणी जमिनीत मुरण्यासाठी चर घेणे, झाडांच्या मुळांना जास्त उष्णता लागू नये यासाठी त्यांना सुकलेल्या गवताने झाकणे असे विविध प्रयोग आनंद वन येथे करत आहेत. आपण या जगात जन्माला आल्यावर आपणही या सृष्टीचे काही देणे लागतो, आपल्या प्रमाणे वृक्ष आणि यात वावरणारी जीवसृष्टी यांनाही जगण्याचा अधिकार आहे आपण त्यासाठी काम केले पाहिजे हे सांगताना संदीप सरांचा आत्मविश्वास झळकतो. या निरपेक्ष भावनेतून काम करणाऱ्या संदीप राठोड सर, साबळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडे पाहून लवकरच आनंदवन महाराष्टात आदर्शवत ठरेल यात शंका नाही. एसा संस्था माध्यमातून अशा समाजात विविध स्थरावर काम करणाऱ्या परोपकारी व्यक्तींची भेट नक्कीच समाधान देणारी आणि नवीन गोष्टी शिकवणारी ठरत आहे हे मात्र नक्की.. - *प्रदिप तांदळे - आनंदवन, मांडवा गाव. दिनांक २० ऑक्टोबर २०२६*.

*आनंद तीर्थ* - चिचोंडी शिराळ, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्या नगर, आपल्या शहरापासून अवघ्या ३० की मी अंतरावर राष्ट्रसंत श्...
16/10/2026

*आनंद तीर्थ* - चिचोंडी शिराळ, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्या नगर, आपल्या शहरापासून अवघ्या ३० की मी अंतरावर राष्ट्रसंत श्री. आनंदजी ऋषी महाराज यांच्या पवित्र जन्मगावी मागील जवळपास ७ - ८ वर्षापासून गुरू आनंद फाउंडेशन यांच्या पुढाकाराने निरंतर सिव्हिल इंजिनिअरींग मधील अद्वितीय स्ट्रक्चरची कामे चालू आहेत. ही कामे पाहण्यास सहसा ट्रस्ट कडून परवानगी दिली जात नाही परंतु येथे ट्रस्टी असलेले आणि आपल्या एसा भवन साठी मोठी मदत केलेले श्री अशोक पितळे सरांच्या सहकार्याने आपणास वरील व्हीजीट आयोजित करणे शक्य झाले आहे. अरणगाव येथील मेहेर बाबा यांच्या ट्रस्ट मध्ये ज्या प्रकारे फेरोसिमेंट आणि इतर प्रकारची स्ट्रक्चर बांधली आहेत तशी वेगळी वैशिष्टयपूर्ण कामे पाहण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळत आहे. आपल्या जैन बांधवांसाठी अतिशय पवित्र असे प्रार्थना स्थळ असणार आहे. आपल्या संस्थेने या ठिकाणी स्टडी टूर आयोजित केली आहे, या निमित्ताने जास्तीत जास्त सभासदांनी आपली नावनोंदणी ग्रूप वर करावी हि नम्र विनंती. 🙏
आर्की. प्रितेश गुगळे, इंजि. धनेश मुनोत, इंजि शाम गुलाटी, इंजि. पंकज झावरे, इंजि. दादा साहेब बेरड अश्या आपल्या संस्थेतील विविध सभासदांनी यातील काही स्ट्रक्चरची आर्किटेक्ट, इंजिनीअर अथवा आर सी सी डिझाइनर या रोल मध्ये कामे केली आहेत. आर्किटेक्टस् आणि इंजिनीअर्स यांनी अवश्य व्हिजीट द्यावीत अशी विविध स्ट्रक्चरची कामे आपणास येथे पाहता येतील. आपण आपल्या या क्षेत्रात काम करणाऱ्या मित्र परीवार तसेच कुटुंबीयांना या ठिकाणी व्हिजीट साठी बरोबर आणि शकता. 🙏

Address

Raj Chember, Kothala Stand Ahmednagar 414001
Ahmednagar
474001

Alerts

Be the first to know and let us send you an email when AESA Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AESA Ahmednagar:

Shortcuts

Share

Category